अखेर कणकवली पर्यटन महोत्सवाचे बिगुल वाजले!

9 ते 12 जानेवारी पर्यंत कणकवलीत होणार पर्यटन महोत्सव

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची संकल्पना, कॅबिनेट मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत उद्घाटन

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची माहिती

माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या
संकल्पनेतून कणकवली पर्यटन महोत्सवाचे गुरुवार 9 जानेवारी ते रविवार 12 जानेवारी दरम्यान कणकवली उपजिल्हा रुग्णालय समोरील मैदानात आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भरगच्च कार्यक्रम व अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत हा पर्यटन महोत्सव होणार आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, राजा पाटकर आदी उपस्थित होते. 9 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता शहरातील 17 वॉर्ड मधील भव्य शोभायात्रा पटकीदेवी मंदिर बाजारपेठ मार्गे, पटवर्धन चौक मार्गे पर्यटन महोत्सव स्थळी उपजिल्हा रुग्णालय पर्यंत काढण्यात येणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता फूड फेस्टिव्हल चे उदघाटन होईल. फूड फेस्टिव्हल साठी मर्यादित स्टॉल असून तुम्हारे 80 स्टॉल या ठिकाणी लागणार आहेत. स्टॉल साठी संजय कामतेकर यंच्याशी संपर्क साधावा. पर्यटन महोत्सवाचे उदघाटन रात्री 9 वाजता कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 10 जानेवारी रोजी कणकवली शहरातील स्थानिक 250 कलाकारांचा आम्ही कणकवलीकर हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. 11 जानेवारी रोजी इंडियन आयडॉल विजेता ऋषी सिंग, गायिका सायली कांबळे व नितीन कुमार हे टॉप स्टार गायक यांचा संगीत नजराणा असणार आहे. रविवार 12 जानेवारी रोजी पर्यटन महोत्सवाचा समारोप खासदार माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते नीलम राणे, कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत होईल. समारोप प्रसंगी दिग्गज गायक आणि सिने स्टार उपस्थित राहणार आहेत. पर्यटन महोत्सवानिमित्त कला क्रीडा सांस्कृतिक खाद्य संस्कृतीशी निगडित रिल्स स्टार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रिल्ससाठी 1 मिनिट वेळ मर्यादा आहे. पहिल्या तीन रिल्स स्टार ना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांक विजेत्याला 10 हजार, द्वितीय विजेत्या स्पर्धकाला 5 हजार व तृतीय विजेत्या स्पर्धकाला 3 हजार बक्षिस दिले जाणार आहे. आक्षेपार्ह रिल्स स्वीकारल्या जाणार नाहीत. 1 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान पोस्ट केलेल्या रिल्स स्वीकारल्या जातील असे नलावडे यांनी सांगितले. या महोत्सवानिमित्त मोठमोठे नामवंत दिग्गज सिनेस्टार व कलाकार येणार आहेत. याबाबतची पुन्हा पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात येणार असल्याची नलावडे यांनी सांगितले.

error: Content is protected !!