गावपळण ग्रामस्वच्छतेचे अभियान जागतिक पर्यावरण वाद्यांनी नोंद घ्यावी–संजय मिराशी

आचरे गावपळणीतून पर्यावरण स्वच्छता होत असल्याने गावचे आरोग्य सुधाणारी गावपळण प्रथा जनजीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.पर्यावरण संवर्धन करणारया या प्रथेची जागतिक पर्यावरण वाद्यांनी नोंद घ्यावी असे मत देवस्थान मानकरी संजय मिराशी यांनी रामेश्वर मंदिर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी त्यांच्या सोबत देवस्थान समिती सचिव संतोष मिराशी, खजिनदार कपिल गुरव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मिराशी यांनी
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान चा इतिहास हा तीनशे वर्षापेक्षा जास्त आहे कोल्हापूरच्या छत्रपतींनी सन 1720 मध्ये श्री देव रामेश्वरला दिलेले आचरा हे इनामगाव आजही देवाच्या मालकीचे असल्याचे सांगितले. आचरा गाव आणि इनामदार श्रीदेवी रामेश्वर या जागृत महा शिवस्थानाला 700 ते 800 वर्षाचा इतिहास आहे असे तज्ञांकडून सांगितले जाते खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी श्री रामेश्वर देवाला अडीच हजार सुवर्ण होन दिल्याची नोंद इतिहास संशोधकांकडून कळते या देवस्थानच्या शेकडो वर्षाच्या प्रथा परंपरा आजही सुरू आहेत .त्यातील गावपळ ही प्रथा गेले अनेक वर्ष सुरू आहे . याबाबत लिखित स्वरूपात पुरावे उपलब्ध नाहीत
गावपळण या प्रथेमागे गाव शुद्धीकरणाचा हेतू आजच्या परिस्थितीतही आमच्या पीढीला भावतो. पूर्वीपेक्षा आजच्या यंत्र युगात या प्रथेची जास्त गरज आहे असे देवस्थानचे मानकरी संजय मिराशी यांनी सांगितले .
. कोरोना काळात लॉकडाऊन कळले पण आचरा गावात लॉक डाऊन म्हणजेच गावपळण ही प्रथा शेकड वर्षापासून सुरू असल्याचे मिराशी यांनी सांगितले.यावेळी त्यांनी या प्रथेमागे कोणतीही अंधश्रद्धा नसून लोकांच्या सहभागातून आजही प्रथा रामेश्वरावर श्रद्धा ठेवून सुरू असल्याचे संजय मिराशी यांनी सांगितले.





