चिंदर येथील भगवती माऊली देवीच्या जत्रोत्सवाला उत्साहात सुरुवात

चिंदर येथील श्री देवी भगवती माऊली जत्रोत्सवास मंगळवार सकाळ पासूनच उत्साहात सुरूवात झाली.दर्शनासाठी सकाळ पासूनच भाविकांनी गर्दी केलीहोती.
सकाळी बारा पाच मानकरी जमल्या नंतर देवीला गा-हाणे घालून साडी चोळी सोन्याच्या दागिन्यांनी मढविण्यात आली.त्यानंतर बारा पाच मानक-यांचे नैवेद्य देवीला अर्पण करण्यात आले. यानंतर भाविकांचे नवस फेडणे ओटी भरणेला सुरुवात करण्यात आली होती. सकाळ पासूनच दर्शनाला मंदिरा बाहेर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. देवीचे दर्शन सुलभ होण्यासाठीदेवस्थान मानकरी, श्री देवी भगवती माऊली सेवा समिती चिंदर चे पदाधिकारी
कार्यकर्ते यांनी विशेष परीश्रम घेत होते.

या जत्रोत्सवात ग्रामिण भागातून मोठ्या प्रमाणात कनगी विक्री साठी येत असल्याने
भगवती माऊलीच्या
जत्रोत्सवाचे ते एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे या जत्रोत्सवाला कनग्याची यात्रा म्हणूनही ओळखली जाते.या जत्रोत्सवाच्या व्यवस्थेसाठी चिंदर ग्रामपंचायत कडूनही विक्रेत्यांना सहकार्य केले गेले होते. पाच दिवस चालणारया या जत्रोत्सवाला पहिल्या दिवसापासूनच उत्साहात सुरुवात झाली आहे.

error: Content is protected !!