फिर्यादी सोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी आरोपीला तीन वर्षाच्या सश्रम कारावासा सहित 15 हजारांचा दंड

जिल्हा न्यायालयाने ठोठावली शिक्षा
कणकवली तालुक्यात नागवे येथे घडली होती घटना
सिंधुदुर्ग पोलिसांच्या उत्कृष्ट तपास कामामुळे आरोपी शिक्षेपर्यंत
फिर्यादी सोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी रुपेश गोपाळ ढवण याला सश्रम कारावास व 15 हजार दंडाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. कणकवली पोलीस ठाणे गु.रजि.नं. 319/2019, भा.द.वि.क. 354 (अ), (1), पोस्को कायदा कलम 8 व 12 हा गुन्हा दिनांक 09.11.2019 रोजी नागवे तांबळवाडी, ता. कणकवली येथे घडला होता. तुळशीचे लग्न लावण्याकरीता फिर्यादी हीचे चुलत आजोबा गावातील मंगला ढवण यांचेजवळ गेलेले होते. सदर ठिकाणचे तुळशीचे लग्न झाल्यानंतर आजोबा व फिर्यादी ही मनोहर ढवण यांचेजवळ तुळशीचे लग्न लावण्यासाठी जात असताना रात्री 08.30 वाजण्याच्या सुमारास आरोपीत रुपेश गोपाळ ढवण याने बॅटरी दाखवतो असे सांगुन फिर्यादी हीचे सोबत अश्लील चाळे केले म्हणुन त्याचेवर वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरच्या घटनेवरुन दाखल गुन्ह्याचा तपास कणकवली पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक रुपाली गोरड यांनी करुन सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले होते.
सदरचा खटला मा. जिल्हा न्यायालयात अभियोग पक्षाच्या बाजुने सरकारी अभियोक्ता श्री. गजानन तोडकरी, यांनी उत्कृष्टपणे चालविला. त्यामुळे तपासातील तांत्रीक व परिस्थीतीजन्य पुरावे प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश, श्री. एच.बी. गायकवाड, यांनी ग्राह्य धरला व नमुद आरोपीस 03 वर्षे सश्रम कारावास व 15,000/- रुपये दंडाची शिक्षा सुनावलेली आहे. सदर खटल्याच्या न्यायालयातील सुनावणीमध्ये पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील व अनिता कोळी यांनी सरकारी अभियोक्ता यांना वेळोवेळी मदत केलेली आहे.
वरीलप्रमाणे अपराधी यांना झालेल्या शिक्षेच्या अनुषंगाने कृषिकेश रावले, अपर पोलीस अधीक्षक, पद्मार पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी गुन्ह्याचे तपासी अधिकारी, पैरवी अधिकारी, सरकारी अभियोक्ता व गुन्हयाचे तपासास मदत करणारे तत्कालीन कणकवली पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केलेले आहे.





