मालवण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाची समजली जाणारी भराडी देवीची आंगणेवाडी यात्रा जाहीर झाले आहे.
ही यात्रा 22 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. यात्रा कधी जाहीर होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले असत. कारण दरवर्षी लाखो भक्तगण आंगणेवाडी यात्रेसाठी येत असतात. यात्रा डाळप करून जाहीर केली जाते. आज डाळप पूर्ण झाल्यानंतर पहाटे अंगणवाडी यात्रेची तारीख जाहीर झाली आहे. यात्रेची तारीख जाहीर झाल्याने आता रेल्वे तिकिटासाठी झुंबड उडणार आहे..