दारिस्ते मधून विद्यार्थ्यांसाठी एसटीची फेरी सुरू करा
युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांची आगारप्रमुखांकडे मागणी
दारिस्ते गावातील नाटळ हायस्कूल येथे शिकत असलेल्या विदयार्थ्यांना रोज 5 कि.मी. पायपीट करावी लागत आहे. मागील वर्षापर्यंत सदर विदयार्थ्यांसाठी सकाळी 09.00 वाजता दारिस्ते गावातून एस.टी. ची व्यवस्था करणेत आली होती. परंतु चालू शैक्षणिक वर्षात सदर एस.टी. बंद असल्याने विदयार्थ्यांना रोज 10 कि.मी. येण्या-जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे विदयार्थ्यांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे ही एसटी फेरी सुरू करा अशी मागणी युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी दारिस्ते ग्रामपंचायत द्वारे कणकवलीआगार व्यवस्थापकांकडे केली आहे. सकाळी 08.30 वाजता दारिस्ते येथून एस.टी. ची व्यवस्था करावी व विदयार्थ्यांची होणारी परवड थांबवावी. जेणेकरून शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास दूर होईल याची आपण तातडीने दखल घ्या अशी मागणी श्री लोके यांनी केली आहे.