कार्यकर्ते आणि जनतेच्या पाठीशी राहणार- वैभव नाईक

तेंडोली, नेरूर, पिंगुळी विभागातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांशी मा. आ. वैभव नाईक यांच्याकडून संवाद

       कुडाळ तालुक्यातील तेंडोली, नेरूर, पिंगुळी  या जिल्हा परिषद विभागात माजी आमदार वैभव नाईक यांनी काल मंगळवारी भेट देऊन पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. निवडणुकीत आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्याबद्दल सर्वांचे वैभव नाईक यांनी आभार मानले. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न मी केला असून येत्या काळातही कार्यकर्ते आणि जनतेच्या  पाठीशी राहणार असल्याचे माजी आमदार वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले. 
       यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,महिला जिल्हा संघटक श्रेया परब, तालुकाप्रमुख राजन नाईक, अतुल बंगे हे प्रमुख पदाधिकारी 
       तसेच नेरूर येथे विभाग प्रमुख शेखर गावडे, सरपंच भक्ती घाडी,उपसरपंच दत्ता म्हाडदळकर,महिला विभागप्रमुख दिपश्री नेरुरकर, लक्ष्मी सडवेलकर, अनन्या हडकर, ऋतुजा खडपकर,प्रवीण नेरुरकर, संतोष कुडाळकर, ऋचा पावसकर, संचिता नेरुरकर,रोशनी नाईक,प्रभाकर गावडे,समीर नाईक,मंजुनाथ फडके,दाजी नाईक, प्रतीक्षा तोंडवळकर,शीतल हळदणकर,मंगेश बांदेकर,श्याम परब, मितेश वालावलकर आदी. 
     तेंडोली येथे विभागप्रमुख संदेश प्रभू, उपविभाग प्रमुख महेश वेळकर, सरपंच अनघा तेंडोलकर, संतोष पाटील, कौशल राऊळ, एम. बी.  गावडे, सविता करंदीकर, कृष्णकांत परब, सचिन गावडे, राजन गावडे, पुरुषोत्तम कदम,सुधीर लुडबे,उमेश घाटकर,सुभाष परब,अस्मिता गावडे,अरुण राऊळ आदी. 
  पिंगुळी येथे विभागप्रमुख गुरुनाथ सडवेलकर,उपविभाग प्रमुख सचिन ठाकूर,निर्मला पालकर,तुषार सामंत,बाबल गावडे,मिलिंद परब,केतन शिरोडकर, बाळा पालव,दत्ताराम लाड,नामदेव तावडे,सचिन सावंत,समिधा परब,उदय तुळसुलकर, दीपक गावडे,सिद्धेश धुरी,दिपक धुरी आदिंसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!