वायंगणी येथील भुमिगत विद्यूत वाहिनीचे काम निकृष्ट दर्जाचे ग्रामस्थ आक्रमक शनिवारी सायंकाळी काम रोखले

वायंगणी येथे रस्त्याच्या कडेला सुरू असलेले भुमिगत विद्यूत वाहिनीचे काम
निकषाप्रमाणे होत नसून निकृष्ट दर्जाचे होत असल्याने संतापलेल्या वायंगणी ग्रामस्थांनी शनिवारी सायंकाळी वायंगणी तिठा येथे संबंधित इंजिनिअरला धारेवर धरत जाब विचारला यावेळी आलेल्या प्रोजेक्टर मॅनेजरने संबंधित काम निकषाप्रमाणे करुन देण्याची ग्वाही दिल्यानंतर सदर काम सुरू करण्यास ग्रामस्थांनी परवानगी दिली.
वायंगणी येथे गेले काही दिवस भुमिगत विद्यूत वाहिनीचे काम सुरू करण्यात आले आहे.सदर भुमिगत विद्यूत वाहिनी टाकण्यासाठी वायंगणी ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार साधारण चार फुटाचा चर मारुन त्यात खाली वाळू टाकणे, नंतर विद्यूत वाहिनीचा पाईप टाकून त्यावर अर्ध गोल झडपे टाकून बुजवायचे असताना सध्या सुरू असलेले काम या निकषाप्रमाणे नसून अर्धवट खणूनच वाळू न टाकताच पाईप टाकून चर बुजवले जात आहेत.तसेच रस्त्याकडेला चर खोदून ठेवल्याने ग्रामस्थांना स्वतःची वाहने बाहेर काढतानाही अडचण होत होती.याबाबत संबंधित कामगारांना विचारणा केल्यास उर्मट उत्तरे दिली जात असल्याने संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी सायंकाळी संबंधित ठेकेदाराला जाब विचारला. निकषाप्रमाणे काम होत नसेल तर काम बंद करा सांगत काम बंद पाडले.यावेळी वायंगणी उपसरपंच अँड समृद्धी आसोलकर,सदा राणे सतिश हडकर,चंदू सावंत,सुशांत आसोलकर, सचिन रेडकर, देवेंद्र हडकर,यांसह बहुसंख्य वायंगणी ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी जाब विचारण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांनी या कामावर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेला इंजिनिअरच नशेत असल्याचा आरोप करत वरीष्ठ अधिका-यांना घटनास्थळी पाचारण केले.यावेळी आलेले. प्रोजेक्ट मॅनेजर गाटूळे
यांनी सदर काम निकषाप्रमाणे करुन देण्याची ग्वाही दिल्यानंतर काम सुरू करण्यास वायंगणी गावाने काम सुरू करण्यास परवानगी दिली.

error: Content is protected !!