समीर नलावडे यांच्या कामाचे सातत्य पाहता कणकवली शहरात निवडणुकीची आवश्यकता वाटत नाही!
सातत्याने चार वर्ष उपक्रम सुरू ठेवल्याबद्दल समीर नलावडे यांचे केले कौतुक
नगराध्यक्ष म्हणून खुर्चीवर जाऊन बसण्याची औपचारिकताच बाकी
एक दिवस छोट्यांचा, खाऊ गल्ली कार्यक्रमाचा आमदार नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ
कणकवली चे माजी नगराध्यक्ष समिर नलावडे यांनी आपल्याकडे सध्या कोणतेही पद नसताना देखील गेली चार वर्ष एक दिवस छोट्यांचा खाऊ गल्ली हा उपक्रम सुरू केला व तो सातत्यापूर्ण सुरू ठेवला. कणकवली शहरात समीर नलावडे व त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून जे काम सुरू आहे ते काम पाहता येत्या काळात होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीत निवडणूक घेण्याची गरज नाही. उमेदवारी अर्ज दाखल करायचा व समीर नलावडे यांनी खुर्चीवर जाऊन बसायचे एवढी जौपचारिकता राहिली आहे. असे उद्गार आमदार नितेश राणे यांनी काढले. कणकवलीत एक दिवस छोट्यांचा खाऊ गल्ली या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार नितेश राणे बोलत होते. या वेळी छोट्या – छोट्या बॉक्स मधून चॉकलेटचा खजिना लुटल्यानतर छोट्या भाग्यवान विजेत्यांना आमदार नितेश राणेंच्या हस्ते गौरवण्यात आले. कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने कणकवलीतील गणपती सान्यावर आयोजित करण्यात आलेल्या एक दिवस छोट्यांसाठी या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. टेंबवाडी रस्ता ते ते गणपती साण्यापर्यंत अवघा परिसर गर्दीने फुलून गेला होता. यावर्षी या कार्यक्रमाचे बारमाही वाहणारा धबधबा हे विशेष आकर्षण होते. अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल, छोट्यांसाठी विविध प्रकारची खेळणी, मिकी माऊस, या सोबतच सेल्फी पॉइंट व गाण्यांचा नजराणा व अनेक विविध उपक्रमांनी एक दिवस छोट्यांसाठीचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यादगार ठरला. कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सेल्फी पॉईंट मध्ये फोटो काढण्यासाठी अनेकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार नितेश राणे यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी जि. प. अध्यक्ष सावंत, संजना सावंत, माजी गटनेते संजय कामतेकर, माजी नगरसेवक मेघा गांगण, अभिजीत मुसळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगरसेवक किशोर राणे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, बंडू गांगण, चारुदत्त साटम, मेघा सावंत, कविता राणे, रवींद्र गायकवाड, प्रतीक्षा सावंत, सुप्रिया नलावडे, संजीवनी पवार, प्राची कर्पे, संजना सदडेकर, राजू गवाणकर, राजा पाटकर नवराज झेमणे,आदि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लागलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल व खेळांच्या ठिकाणी मुलांनी तुडुंब गर्दी केली होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने छोट्यांना खेळण्यासाठी स्पोर्ट स्पॉट तयार करण्यात आला होता. त्यामध्ये तर मुलांनी अक्षरशा धमाल, मस्ती व मजा केली. मुलांच्या पालकांसह मुलांनी खाऊगल्ली मध्ये जोरदार धमाल केली.
दिगंबर वालावलकर /कणकवली