तायक्वांदो बेल्ट टेस्टचा निकाल जाहीर!
कणकवली तालुक्यातील 52 विद्यार्थी झाले होते सहभागी
कणकवली तालुका ऍमॅच्युअर तायक्वांदो असोसिएशन आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील नगरवाचनालय सभागृहात तायक्वांदो बेल्ट प्रोमोशन टेस्टचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत कणकवली तालुक्यातील ५२ विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
ही परीक्षा राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक व पंच भालचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी कणकवली तालुका अससोसिएशनचे सचिव राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक व पंच एकनाथ धनवटे, राष्ट्रीय प्रशिक्षक लाजरी वातकर, प्रणव कुडाळकर, कुणाल नारकर, आकाश तावडे उपस्थित होते.
या बेल्ट परीक्षेत पुढील विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
येलो बेल्ट – दुर्वेन सुद्रिक, ओवी राणे, जुईली कदम, अक्षरा जोपळे, ग्रीष्मा राऊळ, आरवी राऊळ, विधी जाधव, तनिष्का जाधव, लावण्या सावंत, वीरा रासम, आर्या सावंत, वैष्णवी चोडणकर, पार्थ मठकर.
ग्रीन बेल्ट – पियुष परुळेकर, रियांश पोसने, अनन्या पडते, आर्या पडते, वैष्णवी कदम, श्रीजय कदम, चिरा्यु गोसावी, वेद खाडये, अवणी मालपेकर, हर्षाक खेडकर.
ग्रीन वन बेल्ट -हितिका नारकर, स्वरा तावडे, चिराग रेपाळ, भार्गवी दळवी,
ब्लु बेल्ट – स्वरूप गोडवे, देवाशिष नर, शास्वत गाठे, पल्लवी गोगटे, प्रद्युम्न मुळदेकर, अथर्व राणे, पार्थ राणे, गीत पवार, गौरांक पवार, ज्ञानपरी ठोंबरे, आराध्या सबनीस, दुर्वांग यादव.
ब्लु वन बेल्ट – शौर्या तांबे, नभा गोवळकर, श्लोक मंगे तनिष्का राणे, कौतुक कोरगावकर.
रेड बेल्ट – आराध्या सातवसे, सारक्षी तांबे, दुर्वा गावडे, स्वरा महाडेश्वर, श्रेयस नार्वेकर, ऋतुजा शिरवलकर,
रेड वन बेल्ट – लिनेश कदम
या विद्यार्थ्यांनी यश मिळवले
सर्व विद्यार्थ्यांना तायक्वांदो राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच एकनाथ धनवटे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे तायक्वांदो अससोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग चे पदाधिकारी सुधीर राणे, अमित जोशी, विनायक सापळे आदीनी अभिनंदन केले आहे.