शस्त्र परवानाधारकानी परवाने नूतनीकरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

तालुका निहाय नेमून देण्यात आल्या आहेत तारखा

शस्त्र वापरण्यासाठी शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याचा दाखला द्यावा लागणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या शस्त्र परवानाधारकांच्या परवान्याची मुदत 31 डिसेंबर 2024 रोजी संपणार आहे त्यांच्या परवान्याच्या नूतनीकरणासाठी दिवस ठरवून देण्यात आले आहेत. 2 डिसेंबर पासून तालुका निहाय दिलेल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपचिटनीस शाखेमध्ये हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यामध्ये अर्जदाराने विहित नमुन्यातील a 3 अर्ज स्वतःचा पासपोर्ट फोटो सहित द्यायचा आहे. शस्त्र वापरण्या साठी शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे s 3 नमुन्यातील जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र, शस्त्र परवाना नूतनीकरणासाठी फॉर्म s 4 संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांकडून सही शिक्क्यानीशी सादर करावा. शस्त्र पडताळणी केल्या बाबतची संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांचे प्रमाणपत्र. सरपंच, पोलीस पाटील, नगराध्यक्ष यांच्याकडिल वर्तनुक दाखला किंवा आधार कार्ड. मूळ शस्त्र परवाना अर्जासोबत जोडणे बंधनकारक असणार आहे. शस्त्र परवान्या सोबत पाच वर्षाकरिता 2500 रुपये शुल्क भरणे आवश्यक आहे. शस्त्र परवाना नूतनीकरणास विलंब झाल्यास पाचशे रुपये प्रति वर्षाप्रमाणे दंड भरावा लागणार आहे. तसेच विलंबाचे सबळ पुरावा अर्जा सोबत देणे आवश्यक आहे. शस्त्र परवाना नूतनीकरणासाठी लागणारा फॉर्म a 3 हा हेतू सुविधा केंद्र मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदरचे अर्ज हे तालुकास्तरावर स्वीकारले जाणार नाहीत. तसेच पोस्टाने देखील स्वीकारले जाणार नाहीत. व नूतनीकरण झालेले परवाने पोस्टाने पाठवले जाणार नाही. याकरिता नेमून दिलेल्या तारखा दिवशीच शस्त्र परवानाधारकांनी परवान्या सहित उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये देवगड तालुका 2,3,4 डिसेंबर, सावंतवाडी तालुका5,6,9 डिसेंबर, दोडामार्ग 10 व 11 डिसेंबर, मालवण 12 13 व 16 डिसेंबर, कुडाळ 17, 18 व 19 डिसेंबर. कणकवली 20,23,24 डिसेंबर. वेंगुर्ले 26 व 27 डिसेंबर, वैभववाडी 30 व 31 डिसेंबर रोजी तारखा नेमून देण्यात आल्या आहेत. तरी या दिलेल्या तारखेला परवानाधारकांनी वरील प्रमाणे कागदपत्रासहित उपस्थित राहावे असे आवाहन अप्पर जिल्हा दंडाधिकारी नितीन राऊत यांनी केले आहे.

error: Content is protected !!