ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये “भगीरथ प्रतिष्ठान”तर्फे डिजिटल बोर्ड प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.

कणकवली/मयूर ठाकूर

ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे येथे भगीरथ नागरी विकास प्रतिष्ठान या संस्थेतर्फे एक अत्यंत प्रेरणादायक आणि उपयुक्त डिजिटल बोर्ड प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात शिक्षणाच्या आधुनिक प्रवाहात डिजिटल शिकवणी किती महत्त्वाची आहे यावर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल सर तसेच सल्लागार डी.पी तानावडे सर मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई मॅडम,माड्याची वाडी नेरुर चे मुख्याध्यापक अनंत सामंत सर ,श्री. अत्तार सर, मालवणकर सर , नाटळ हायस्कूलच्या मुख्याध्यापिका तेली मॅडम, यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमात भगीरथ प्रतिष्ठांनची प्रशालेला डिजिटल बोर्ड देण्याची संकल्पना काय आहे ही श्री. अनंत सामंत सरांनी स्पष्ट केली डॉ. प्रसाद देवधर सर यांची भगीरथ प्रतिष्ठान ही संस्था असे उपक्रम जिल्हाभरात राबवत आहे .
प्रमुख मार्गदर्शक अत्तार सर यांनी शिक्षकांना डिजिटल बोर्डवर विविध शिक्षण सामुग्री तयार करण्याची आणि सादर करण्याची महत्त्वपूर्ण कौशल्य शिकवले.डिजिटल बोर्डचा वापर विद्यार्थ्यांचा लक्ष वेधून घेणारी शिकवणी आणि संवादात्मक पद्धती साकारण्यात मदत करतो व त्यांना अधिक सृजनशील बनवू शकतो.
या कार्यक्रमासाठी दाभोळ हायस्कूलचे मुख्याध्यापक सोन्सूरकर सर,करुळ हायस्कूलचे जाधव सर, गुरव सर ,तसेच होळकर सर आयडियल चे सर्व शिक्षक ,शिक्षिका उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष उपाध्यक्ष श्री मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा.हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई,प्रशालेचे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.बांदल मॅडम यांनी केले.

error: Content is protected !!