सेवानिवृत्त महसूल कर्मचारी गंगाराम राऊळ यांचे निधन

कसवण तळवडे तंटामुक्ती अध्यक्ष पदावरही केले होते काम

कणकवली तालुक्यातील कसवण तळवडे गावचे रहिवासी व सेवानिवृत्त महसूल कर्मचारी गंगाराम राउळ (वय 71) यांचे नुकतेच निधन झाले. कणकवली तहसीलदार कार्यालयामध्ये सुरूवातीला कोतवाल होते. त्यानंतर नियमानुसार शिपाई या पदावर नियुक्ती झाली. अत्यंत विश्वासू, प्रामाणिक, कष्टाळू असलेले सर्वांचे आवडीचे व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. त्यानंतर वाहन चालक या पदावर मिळालेल्या संधीचे सोने केले. आलेल्या प्रत्येक अधिकारी वर्गाचे आवडते झाले. अत्यंत नम्र, विनयशील असलेले गंगाराम हे निवृत्ती नंतर सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत असताना कसवण तळवडे ग्रुप ग्रामपंचायतीचे बिनविरोध तंटामुक्ती अध्यक्ष झाले. अजत शत्रू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या
पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.

error: Content is protected !!