खारेपाटण येथे आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रचार फेरी संपन्न

महायुतीचे असंख्य कार्यकर्ते प्रचार फेरीत सहभागी
महायुतीचे कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे भाजपा उमेदवार आम. नितेश राणे यांच्या प्रचारार्थ आज खारेपाटण शहरात प्रचारफेरी संपन्न झाली. आम. नितेश राणे यांनी स्वतः या प्रचार फेरीत उपस्थित राहून खारेपाटण मधील ग्रामस्थ, व्यापारी व इतर मतदारांची भेट घेतली.महायुतीतील सर्वच घटक पक्षांचे कार्यकर्ते या प्रचार फेरीत एकवटले असून सर्व कार्यकर्त्यां सह आम. नितेश राणे यांनी प्रचार केला.खारेपाटण मध्ये महायुतीचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी आम नितेश राणे यांचा जोरदार प्रचार करत असून प्रचारात आघाडी घेतली आहे.
महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारा करीता खारेपाटण येथे आज प्रचार फेरी दरम्यान सरपंच प्राची इस्वलकर,भाजप कार्यकर्ते रमाकांत राऊत,रवींद्र जठार, दिलीप तळेकर, रवी शेट्ये,सूर्यकांत भालेकर, सुधीर कुबल,उज्वला चिके, निशा शेलार,शिवसेना शिंदे गटाचे कणकवली उपतालुका प्रमुख श्री मंगेश गुरव,खारेपाटण ग्रा.पं.सदस्य गुरुप्रसाद शिंदे,भाऊ राणे,इस्माईल मुकादम, रफिक नाईक,सुरेंद्र कोरगावकर,कांता झगडे,सिद्धेश शेट्ये, महावीर होनाळे,गणेश कारेकर,राज गुरव,निरंजन चव्हाण,अनिल गुरव,महिला कार्यकर्त्या आरती गाठे,साधना धुमाळे,ग्रा.पं.सदस्य मनाली होनाळे,समीक्षा गुरव,आदी भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.





