खारेपाटण गुरव वाडी येथे संदेश पारकर यांचा जोमाने प्रचार सुरु

जि. प. संपर्क प्रमुख शिवसेना (UBT)-सतीश गुरव मतदारांच्या घरोघरी जाऊन संदेश पारकर यांचा करीत आहेत प्रचार
शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खारेपाटण येथे महाविकास आघाडी उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा श्री.देव कालभैरव मंदीरात नारळ वाढवून प्रचाराला शुभारंभ करण्यात आला असून खारेपाटण मध्ये संदेश पारकर यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. गुरव वाडी तसेच खारेपाटण मधील इतर सर्व वाड्या मध्ये जाऊन कार्यकर्ते जोमाने प्रचार करीत आहेत.लोकांकडून सुद्धा खूप चांगला प्रतिसाद संदेश पारकर यांना मिळतं असल्याचे दिसून येत आहे.
यावेळी निखिल गुरव ,तेजस राऊत,दिंगम्बर राऊत,यांच्यासाह अनेक कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले आहेत.





