साकेडी गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर राणे यांचे निधन

गावच्या सामाजिक, धार्मिक उपक्रमांमध्ये असायचे सहभागी
कणकवली तालुक्यातील साकेडी फौजदारवाडी येथील रहिवासी यापूर्वी मुंबई भांडुप येथे वास्तव्यास असणारे मधुकर नारायण राणे (83) यांचे मुंबई भांडुप येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. साकेडी गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले होते. साकेडी गावच्या विकास प्रक्रियेतही त्यांचे मोलाचे योगदान होते. गावच्या धार्मिक, सामाजिक उपक्रमांमध्ये ते नेहमी हीहिरीने सहभागी होत असत. त्यांना काजू बागायतीची देखील आवड होती. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा विवाहित मुली, सून, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर मुंबई भांडुप येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.





