कणकवली शहराच्या विकासासाठी आमदार नितेश राणे यांच्या पाठीशी उभे रहा!

माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे यांचे प्रचारफेरी दरम्यान आवाहन

कणकवली शहरातून भाजपाची दमदार प्रचार फेरी

कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार व महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना कणकवली शहरातून मोठे मताधिक्य देणार असल्याचा विश्वास माजी नगरसेविका सुप्रिया समीर नलावडे यांनी व्यक्त केला. कणकवली शहरात बाजारपेठेमध्ये आज प्रचार फेरी काढण्यात आली होती. यादरम्यान त्यांनी ही माहिती दिली. कणकवली शहरातील जनतेने आमदार नितेश राणे यांना मतदान करण्याचे आवाहन करताना कणकवली शहराचा विकास हा कुणामुळे झाला हे जनता जाणते आहे. आमदार नितेश राणे यांच्या हाती कणकवली नगरपंचायत ची सत्ता आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने विकासाची घोडदौड सुरू ठेवली हीच घोडदौड यापुढेही सुरू ठेवण्यासाठी आमदार नितेश राणेच पुन्हा हवेत. यासाठी जनतेने त्यांना मतदान रुपी पाठिंबा देण्याची आवाहन सुप्रिया नलावडे यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेविका मेघा गांगण, राजा पाटकर, पंकज पेडणेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!