युवा पिढीला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान महत्त्वाचा : प्रवीण दरेकर

सिंधुदुर्ग सुपुत्र डॉ. विशाल कडणे यांच्या संकल्पनेचे कौतुक

‘युवा पिढीला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान आणि गौरव आजच्या काळात कमी झाला आहे. मात्र, ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चैरिटेबल ट्रस्टने अशा घटकांचा सन्मान सोहळा आयोजित केला, यासाठी विशाल कडणे यांचे अभिनंदन!’ असे गौरवोद्‌गार भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी काढले. डॉ. विशाल कडणे यांच्या संकल्पनेतून ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे राज्यस्तरीय ‘शिक्षक स्नेह मेळावा’ संपन्न झाला, यावेळी आ. दरेकर बोलत होते. यावेळी कणकवली तालुक्यातील तोंडवली येथील सरस्वती समूहाच्या सौ. वर्षा सावंत यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाचे खजिनदार पवन त्रिपाठी, संपादक किरण शेलार, टिजेसबी बँकेचे डिजीएम राजीव मिश्रा, लेखक व दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन, क्षितीज सातधरे, मुंबई शिक्षक आघाडीचे अध्यक्ष राजू बंडगर, सोमैया विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. गजानन रत्नपारखी, दाण्याचे कमलेश प्रधान, सरस्वती समूहाच्या वर्षा सावंत, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे , २०० शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांसह विविध दिग्गज आणि शिक्षण क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित होते. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील दोन हजारहून अधिक शिक्षक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सिंधुदुर्ग सुपुत्र युवा शिक्षक नेतृत्व डॉ. विशाल कडणे होते. या मेळाव्यामध्ये राज्यस्तरीय निबंधस्पर्धा, टीचर ऑफ द इअर, प्रिन्सिपल ऑफ द इअर आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या शिक्षकांना ‘जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. वर्ष २०२३ साली उत्कृष्ट कामगिरी केलेल्या १११ शिक्षकांचा सन्मान मेळाव्यात करण्यात आला. जीवन गौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक, सर्वोत्कृष्ट विषय शिक्षक आदी विविध पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले.

स्मार्टफोन दुरुपयोगापासून तरुणाईला परावृत्त करणे आणि सर्वांना मराठी भाषेचा, अक्षरांचा लळा लावणे, आदी लोकोपयोगी या वृत्तींचा प्रचार करणाऱ्या आजीबाई जोरात नाटकाच्या टीमने शिक्षकांसोबत संवाद साधला. यावेळी या नाटकाचे दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन, अभिनेत्री निर्मिती सावंत आणि अभिनेते जयवंत वाडकर उपस्थित होते. सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेत्री नेहा परांजपे यांनी केले. दै. ‘मुंबई तरुण भारत’ हे मीडिया पार्टनर आहेत.


एका विद्यार्थ्यांने आपला ‘जीवन गौरव’ देत सन्मान करावा म्हणजे आपल्या जीवनाचे सार्थक झाले, असे म्हणावे लागेल. विद्यार्थी कसा घडावा? विद्यार्थी कसा असावा? याचे हे उदाहरण आहे. माझी संपूर्ण शाळा माझी संस्था आणि सर्व शिक्षक हे विशालच्या पाठीशी कायम उभे असतील. हे त्याचे कार्य असे पुढे उत्तरोत्तर वाढू दे, अशा त्याला शुभेच्छा देते.

error: Content is protected !!