भाजपचे बंडखोर विशाल परब यांच्यागाडीवर मध्यरात्री हल्ला.
सिंधुदुर्ग-
सावंतवाडी मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब हे मध्यरात्री घरी परतत असताना
सावंतवाडी मळगाव स्टेशनजवळ यांच्या गाडीवर बांबूने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्लेखोर हल्ला करून जंगलात पळुन जात असताना स्थानिकांनी हल्लेखोराला शिताफीने पकडले असून त्याला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तो झारखंड राज्यातील असल्याचे समजते.
हल्ल्याच्या प्रयत्नानंतर विशाल परब यांच्या कार्यकर्त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गर्दी केली होती. याबाबतची तक्रार सावंतवाडी पोलीस ठाण्यात उशिरा देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण हे अधिक तपास करत आहेत. दरम्यान कोणी कितीही दहशत माजवली तरी जनतेच्या प्रतिनिधी म्हणून मी निवडणूक लढवण्यापासून परावृत्त होणार नाही.असे विशाल परब यांनी म्हटले आहे.