आमदार वैभव नाईक यांच्या गाव भेट दौऱ्याला मिळतोय उस्फुर्त प्रतिसाद

आमचा हक्काचा आमदार निवडून येणार जनतेला विश्वास

विरोधी पक्षाकडून होणाऱ्या खालच्या पातळीवरच्या टीकेला जनता देणार मतदानाच्या माध्यमातून उत्तर

कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांना गेले काही दिवस प्रचारामध्ये कुडाळ मालवण मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आमदार वैभव नाईक यांचा झंझावात मतदारसंघात सर्वत्र पसरला आहे. विरोधी पक्षाकडून आमदार वैभव नाईक यांच्यावर सातत्याने खालच्या पातळीवर टिकीची झोड उठवली जात असताना आमदार वैभव नाइक यांच्याकडून मात्र शांत व संयमी राजकारण करून सुसंस्कृतपणाचे दर्शन घडवले जात आहे. यातच गावागावांमधून आमदारांच्या गाव भेट दौऱ्यामध्ये जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने येत्या काळात आमदार वैभव नाईक यांचा विधानसभा निवडणुकीत विजय पक्का असल्याचे मत अनेक मतदारांनी या गावभेटीदरम्यान व्यक्त केले आहे. अक्षरशा मतदारसंघ पिंजून काढत आमदार वैभव नाईक यांनी जनतेला साद घातली आहे. अडीच वर्षाच्या सत्ता काळात सर्वाधिक निधी कुडाळ मालवन मतदारसंघात आणल्याने जनतेने या विकासाची जाण ठेवावी असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. जनतेने देखील अडीनडीला धावून येणारा आमचा हक्काचा आमदार अशा शब्दात आमदार वैभव नाईक यांचे वर्णन केल्याने आमदार वैभव नाईक यांचा विजय पक्का असल्याचे मत त्यांच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमधून व्यक्त केले जात आहे.

कुडाळ प्रतिनिधी

error: Content is protected !!