युवासेना तालुका संघटकपदी राकेश धर्णे

युवा सेनेच्या दोडामार्ग तालुका संघटकपदी राकेश नामदेव धर्णे यांची नियुक्ती करण्यात आली.तालुक्यातील युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका शुक्रवारी (ता. १८) करण्यात आल्या. यावेळी त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आलीतालुका संघटक पदी राकेश नामदेव धर्णे . विभाग प्रमुख पदी विनय दळवी , ऋतिक करमळकर, उपतालुका प्रमुख पदी आपा वसंत गवस, कृष्णा गवस तर उप विभाग प्रमुख पदी अतुल गवस यांची नेमणूक करण्यात आली.यावेळी शिवसेना (शिंदे गट ) तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर,समन्वयक शैलेश दळवी व युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, युवा तालुकाप्रमुख भगवान गवस,उपतालुका प्रमुख दादा देसाई, तिलकांचन गवस, मायकल लोबो, रामदास मेस्त्री, शहरप्रमुख योगेश महाले, गोकुळदास बोंद्रे, गुरूदास सावंत, महीला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, सान्वी गवस, महिला पदाधिकारी, शिवसेना व युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!