न्यू इंग्लिश स्कूल आचरा आयोजित विज्ञान प्रदर्शनात सद्गुरु साटेलकरच्या रडार सिस्टीम प्रतिकृती ला प्रथम क्रमांक

विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळावा त्यांच्या शोधक वृत्तीला चालना मिळावी यादृष्टीने न्यू इंग्लिश स्कूल आचरा तर्फे शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या विज्ञान प्रदर्शनात सद्गुरु साटेलकर ने बनविलेल्या रडार सिस्टीम ला प्रथम क्रमांक मिळाला. द्वितीय क्रमांक कौशल भोसले, विक्रम भुतकडे यांनी बनविलेल्या रिचार्जेबल टेबल फॅन या प्रतिकृती ला मिळाला.तर तृतीय क्रमांक तेजस शेटये यांनी बनविलेल्या ग्रासकटर, कुंदन नाटेकर स्मार्ट होम या दोन प्रतिकृतींना विभागून देण्यात आला. न्यू इग्लिश हायस्कूलआचरा शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ६वी ते१९ वीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्पर्धेचे बक्षिस वितरण स्थानिक शाळा समिती अध्यक्षा निलिमा सावंत,सदस्य राजन पांगे, अर्जुन बापर्डेकर,संजय पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब यांच्या हस्ते झाले.प्रदर्शन यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक घुटूकडे, मधुरा माणगांवकर.प्रकाश महाभोज,राजम सर,साटेलकर सर आदींनी विशेष मेहनत घेतली. या प्रदर्शनात एकूण सोळा प्रतीकृती ठेवण्यात आल्या होत्या. धी आचरा पीपल्स असोसिएशन संस्था अध्यक्ष प्रदीप मिराशी कार्याध्यक्ष प्रदीप परब मिराशी यांनी विज्ञान प्रदर्शन यशस्वी केल्याबद्दल सहभागी विद्यार्थी प्रोत्साहन देणारे मुख्याध्यापक,शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!