सीराक गृप आणि रंगभूमी गावातील तर्फे भव्य कंदिल स्पर्धा

आचरा-अर्जुन बापर्डेकर
दिवाळीचा आनंद तेजोमय व्हावा आणि हरवत चाललेली कंदिल बनवणे
कलागुणांना वाव मिळण्याकरिता,सिरॉक ग्रुप आचरा व रंगभूमी गावातली यांच्या संयुक्त विद्यमाने आचरा येथे कंदिल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा
आचरा चिंदर, त्रिंबक, वायंगणीसाठी
आयोजित करण्यात आली आहे. यासाठी दिनांक ३० ऑक्टोबर पर्यंत कंदिल तयार करून तो आपण आपल्या दाराबाहेरील रस्ता किंवा पाणंद किंवा पायवाट या ठिकाणी किमान १० ते १५ फूट उंची वरच लावायचा आहे.
परीक्षक आपण दिलेल्या पत्त्यावर म्हणजेच आपल्या घरी येऊन आपल्या कंदीलाचे संध्याकाळी परीक्षण करतील.
कंदीलाची लांबी, रुंदी,उंची कमीत कमी दोन फूट असावी, तसेच त्यामध्ये विद्युत दिवा, (बल्ब) असणे आवश्यक आहे.

आपल्या कंदीलाचा युट्युब व्हिडिओ बनवला जाईल त्यामुळे आपले कौशल्य इतरांनाही कळेल
स्पर्धेमध्ये कुटुंब,फ्रेंड्स सर्कल बचत गट, वाडी मंडळ, महिला मंडळ म्हणजेच पंचक्रोशीतील कोणीही भाग घेऊ शकतात. यासाठी
प्रथम क्रमांक रुपये ४००१/-
द्वितीय क्रमांक रुपये ३००१/-
तृतीय क्रमांक रुपये २००१/- असून

उत्तेजनार्थ प्रथम आणि उत्तेजनार्थ द्वितीय प्रत्येकी रुपये ५०० /-

स्पर्धेसाठी प्रवेश फी रुपये 150/- असून. प्रवेशिका फॉर्म मिळण्याचे व भरण्याचे ठिकाण..सी कॅफे आचरा
हॉटेल सिरॉक शेजारी

Leave a Reply

error: Content is protected !!