वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान चे माजी अध्यक्ष वामन पंडीत यांची महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ सदस्यपदी निवड

संस्थेच्या वतीने वामन पंडित यांचे अभिनंदन

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली चे माजी अध्यक्ष वामन तथा उदय पंडीत यांची महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ सदस्यपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड करण्यात आली आहे. या मंडळ सदस्य निवडीस महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. मराठी विश्वकोश निर्मितीत या मंडळाच्या माध्यमातून मदत व मार्गदर्शन केले जाणार आहे .राज्यातून २५ सदस्यांना या मंडळात सदस्यपद मिळाले आहे.गेली पन्नास वर्षे सांस्कृतिक,साहीत्य,प्रकाशन.संपादन या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वीची निवड झाल्याने संस्थेच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला . संस्थेचे सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे विश्वस्त मा. समीर नवरे, कार्याध्यक्ष ॲड एन. आर .देसाई, कार्यवाह शरद सावंत,खजिनदार धनराज दळवी, सहकार्यवाह सीमा कोरगावकर, कार्यकारिणी सदस्या लिना काळसेकर,
राजा राजाध्यक्ष प्रसन्ना देसाई , राजन राऊळ उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर कणकवली

Leave a Reply

error: Content is protected !!