विद्यामंदिर मध्ये शारदोत्सवा निमित्त “स्त्री सुरक्षतता व साक्षरता” प्रसार मिरवणूक

शरदोत्सवा निमित्त विद्यामंदिर कडून प्रबोधन
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शारदोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला . विद्यार्थ्यांना भक्तीमार्ग व समाज प्रबोधन या उद्देशाने स्त्रीयांचे समाजातील स्थान आणि महत्व स्रियांच्यावर होणारे अत्याचार आणि समाज माध्यवर होणारे परिणाम यांचा धागा पडकडून शारदा मातेच्या आगमनाची मिरवणूक काढण्यात आली यामध्ये प्राथमिक विभागातील विद्यार्थांनी सुंदर रितीने नृत्य नाट्य सादरीकरण करून कणकवली शहरात देवीरूपात स्त्रीने समाजातील दृष्ट प्रवृतींचा नाश करण्यासाठी वापरलेले शस्त्र आणि विचारधारा या विषयी सुंदर पद्धतीने सादरीकरण करत शारदे मातेचे विद्या प्रसाराचे महत्व मिरवणुकीच्या माध्यमातून करण्यात आले. विद्यामंदिर प्राथमिक विभागातील विद्यार्थांनी नेटके नियोजन करून साक्षरतेचा प्रसार विविध कला आविष्कारातून करून समाजाला प्रबोधन केले यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक पिराजी कांबळे, पर्यवेक्षक जाधव, अच्युतराव वणवे,.करंबळेकर, केळूसकर मॅडम सांस्कृतिक विभाग प्रमुख सिंगनाथ व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी