साकेडी रस्त्यावरील पुलाच्या कामाची कार्यकारी अभियंत्यांकडून पाहणी

डांबरी रस्त्यासह अन्य आवश्यक ठिकाणी कामे मार्गी लावण्याच्या दिल्या सूचना

काम दर्जेदार मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांनी मानले कार्यकारी अभियंत्यांचे आभार

कणकवली तालुक्यातील हुंबरट साकेडी रस्त्यावर साकेडी हद्दीतील तानेकोंडीचा व्हाळ या ठिकाणी नव्याने बांधलेल्या पुलाच्या कामाची पाहणी कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी आज आपल्या अधिकाऱ्यांसह केली. या ठिकाणची असलेली साफसफाई तसेच डांबरी रस्ता यासोबतच पुलाच्या बाजूच्या भागात मातीचा भराव वाहून ओहळ बुजु नये याकरिता उपाययोजनांबाबत कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. श्री सर्वगोड यांनी आज या पुलाच्या कामाची पाहणी करत कामाच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच या ठिकाणी डांबरी रस्त्याचा भाग काही प्रमाणात करायचा शिल्लक असून पावसाळा संपल्यावर हे काम लगेचच मार्गी लावून घ्या अशा सूचना त्यांनी दिल्या. या पुलालगत रस्त्याची संरक्षण भिंत वाढीव करण्यात आली असून उर्वरित भागातही संरक्षण भिंत करून पाणी जाण्याकरता गटाराची योग्य व्यवस्था करा. तसेच ज्या ठिकाणी भराव झालेला आहे तेथे पीसीसी करून केलेला डांबरी रस्ता खचणार नाही याची काळजी घ्या. तसेच एका बाजूने पुला लागत असलेली माती भविष्यात कोसळून ओहोळ बुजला जाऊ नये याकरिता तेथे देखील संरक्षण भिंत बांधा अशा सूचना श्री सर्वगोड यांनी केल्या. या पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून उर्वरित भागाला रंगरंगोटी करून देखील पूल वाहतुकी सहित दिसायला देखील सुंदर असला पाहिजे त्या दृष्टीने उपाययोजना करा अशा सूचना श्री सर्वगोड यांनी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत उपअभियंता विनायक जोशी, शाखा अभियंता शुभम जुडये यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य दिगंबर वालावलकर यांनी श्री सर्वगोड यांनी गावाच्या दृष्टीने हे काम स्वतः जातीनिशी लक्ष देऊन मार्गी लावून घेतल्याबद्दल तसेच या ठिकाणी हुंबरंट व साकेडी व मधील गणेश मूर्ती विसर्जना करता पुलाच्या कामासोबतच गणपती साण्याचे देखील काम करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!