विद्या मंदिर माध्यमिक प्रशालेत वन्यजीव साप्ताह साजरा

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत सामाजिक वनविभाग कणकवली यांच्या माध्यमातून प्रशालेत वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला यावेळी प्रशालेतील विद्यार्थांना सर्पमित्र भरत जोशी ऑल इंडिया सर्पमित्र तज्ञ . यांनी मार्गदर्शन केले भारतातील वन्य जीव अभय अरण्य तसेच भारतात आढणारे साप त्यांचे नैसर्गिक पर्यावरणातील स्थान दुर्गम भागातील सापांची वस्तीस्थाने सर्पदंश झाल्यानंतर घ्यावयाची काळजी प्राथमिक उपचार यांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले संपूर्ण साप या सरपटणाऱ्या प्राण्यांची इंथत्भूत माहिती प्रोजेक्टरवर दिली .विविध सापांचे प्रकार विषारी साप बिन विषारी साप यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली . तसेच सामाजिक वनिकरणांचे अधिकारी वर्ग श्री अनिल पाटील साहेब प्रकाश पाटील साहेब सौ शिंदे तसेच सावंतवाडी ‘कुडाळ ‘ वैभववाडी रेंजचे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते पर्यावरण प्रमुख प्रसाद राणे सर यांनी प्रास्ताविक केले पाहुण्याचे स्वागत पुष्पगुच्छ देवून केले पृथ्वीराज राज बर्डे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला . मुख्याध्यापक पिराजी कांबळे सर यांनी पर्यावरण रक्षणात वनिकरणाचे महत्व विषद केले या वेळी पर्यवेक्षक वृषाली जाधव मॅडम श्री वणवे सर नागभिडकर सर व विद्यार्थी उपास्थित होते.