निलेश राणेंचे शिवसेनेत स्वागतच….

महायुती मजबूत करणार हा पक्षप्रवेश
आता शिवसेना कार्यकर्त्यांना महायुतीत मिळणार सन्मान-मंगेश गुरव,शिवसेना जिल्हा प्रवक्ते
माजी खासदार निलेश राणे यांचे शिवसेनेत (शिंदेगट )प्रवेश करणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेला नवसंजीवनी देणारे ठरणार आहे.
शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेत असणाऱ्या राणेसाहेबांना नगरसेवक आमदार मंत्री व मुख्यमंत्री पद मिळाले हे केवळ शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळेच.
हे फक्त शिवसेनेत घडू शकते.आता निलेश राणेंच्या रूपाने पुन्हा शिवसेना प्रवेश म्हणजे एक ऐतिहासिक क्षण आहे. एक वर्तुळ या निमित्ताने पूर्ण होईल.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे , तसेच पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या विचारांची शिवसेना वाढीसाठी निलेश राणे यांचा प्रवेश फायदेशीर ठरेल. त्यांचे समर्थक सहकारी पूर्ण जिल्ह्यात ताकदीने शिवसेना वाढवतील.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीनही आमदार हे महायुती चे निवडून येतील.
ज्याप्रमाणे लोकसभेला भाजपला शिवसेनेने साथ दिली तशीच भक्कम साथ विधानसभेला शिवसेना देईल.
आता सावंतवाडी कुडाळ प्रमाणे कणकवली तही शिवसेनेचा पदाधिकाऱ्याला मान सन्मान व समानतेची वागणूक मिळेल अशी आशा करायला हरकत नाही.
महायुती हिंदुत्वाच्या भक्कम पायावर उभी आहे राज्यात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या विविध लोक कल्याण करी योजना तलागला पर्यंत पोचवून शिवसेना पक्ष वाढवून शिंदे साहेबाना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी, व निलेश राणे साहेबांना विधानसभेत पाठवण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन मंगेश गुरव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण