आचरा येथे समूह नृत्य स्पर्धेत द व्हिक्टोरी ग्रुप देवगड संघ विजेता

आचरा–अर्जुन बापर्डेकर
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान गणेशोत्सवानिमित्त श्री ब्राम्हण देव सांस्कृतिक विकास मंडळ आचरा पारवाडी तर्फे आयोजित जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेत द व्हिक्टोरी ग्रुप देवगड संघाने प्रथम क्रमांक मिळविला.विजेत्यांना रोख 15021आणि चषक देवून गौरविण्यात आले.
तर उपविजेत्या परी ग्रुप कुडाळ ला रोख 10021 आणि चषक देवून गौरविण्यात आले.
तृतीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल आचरा आणि एस. के. ग्रुप कणकवली यांना विभागून देण्यात आलां. उत्तेजनार्थ
श्री समर्थ समई कला पथक खुडी, डोंगरेवाडी गर्ल ग्रुप आचरा, मिळुनी साऱ्याजनी नांदगाव, व्हिक्टर क्यू डान्सर्स आचरा यांना गौरविण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन देवस्थान समिती सचिव संतोष मिराशी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांच्या सोबत मंडळाचे अध्यक्ष मुकेश पुजारे,देवस्थान समिती
खजिनदार कपिल गुरव, मंगेश मेस्त्री, बाबू परुळेकर, अर्जुन बापर्डेकर,रवींद्र गुरव, पवनकुमार पराडकर, यांसह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदि उपस्थित होते.
या कार्यक्रम साठी परीक्षक म्हणून मुंबई येथील बसुराज गुरव आणि रुपेश साटम यांनी काम पाहिलं होत. सूत्र संचालन प्रभूदास आजगावकर आणि मुकेश सावंत यांनी केले