कार्यकारी अभियंत्यांची भेट घेण्यासाठी जाणार, लक्षात ठेवा आम्ही अन्यायाविरुद्ध लढणारे आहोत!

शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत यांचा कार्यकारी अभियंत्यांना इशारा

विविध विकासकामे व अन्य प्रश्नांवर सातत्याने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेण्यासाठी जाऊन त्यांची भेट होत नसल्याने आता याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या पत्रात तालुकाप्रमुख कन्हैया पारकर व प्रथमेश सावंत यांनी म्हटले आहे आम्ही आपल्या कार्यालयामध्ये अनेक दिवस येऊन गेलो. परंतु आपल्याशी भेट होऊ शकलेली नाही. त्याामुळे आपल्या विभागातील अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करुन त्यांच्याजवळ तुमच्या भेटीची वेळ आम्ही मागितली. परंतु अद्याप पर्यंत आपल्या भेटीचा आम्हांला वेळ देण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्ही शिवसेना पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन मंगळवार ८ रोजी सकाळी ११.३० ते १२ या वेळेत आम्ही आपल्या कार्यालयात येणार आहोत व आपल्याशी चर्चा करणार आहोत.
या तालुक्यातील या मतदारसंघातील विलंबीत कामे तसेच निकृष्ट कामे यांच्यावर आमच्याजवळ असलेल्या पुराव्या बाबत आम्ही चर्चा करणार आहोत. तरी आपली भेट मिळावी व चर्चा घडावी. लोकशाही मध्ये आम्ही आपल्याकडून अपेक्षा करतो, आपली भेट होणं व चर्चा होणं हे महत्त्वाच आहे. तरी आपण आमच्या संयमाचा अंत पाहू नये. आशा आहे आम्हांला, आपली मंगळवारी भेट होईल, बाकी काही नाही. आमचा पक्ष अन्यायाविरुद्ध लढणारा पक्ष आहे, हे आपण विसरु नये.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!