युवतीशी लगट करणे आले अंगलट त्या सेवानिवृत्ताला बेदम चोप

कणकवली शहरालगत घडला प्रकार
तोंडाला काळे फसत घातला चपलांचा हार
कणकवली शहरालगत असलेल्या एका गावातील एका अल्पवयीन युवतीच्या गरिबीचा गैरफायदा घेत एका आंबट शौकीनाने युवतीशी अतिप्रसंग करत लगट करण्याचा प्रयत्न केला. सुशिक्षित व एका सशस्त्र प्राधिकरणातून निवृत्त झालेल्या या निवृत्त झालेल्या आंबट शौकीननाला युवतीच्या वाडीतील ग्रामस्थांनी बेदम चोप दिला. अक्षरशा लाथा बुक्क्यांनी मारहाण करत त्या विकृत सेवानिवृत्ताला पोलिसात आणण्यात आले होते. मात्र पोलिसांनी सदर घटनेची तक्रार द्या. अशी मागणी त्या ग्रामस्थांकडे केली असता त्या ग्रामस्थांनी सदर पीडित महाविद्यालयीन युवतीची बदनामी होईल या कारणास्तव तक्रार देणे टाळले. परंतु त्या व्यक्तीला पुन्हा माघारी नेत पुन्हा बेदम चोप दिला. तसेच त्याच्या तोंडाला काळे फासत, चपलांचा हार घालून त्याची धिंड काढण्यात आल्याचे समजते. दरम्यान ही घटना आज बुधवारी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. दुपारी 12 वाजेपर्यंत हा सारा प्रकार सुरू होता. उपलब्ध माहितीनुसार सदर व्यक्ती ही केंद्र शासनाच्या सशस्त्र प्राधिकरणातून सेवानिवृत्ती झाली असून त्या व्यक्तीच्या घराजवळ ती पीडित युवती वस्तू देण्यासाठी गेली होती. काल देखील या आंबट शौकीनाने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला असे समजते. आज तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत ती घरात गेली असता विकृताने तिच्याशी लगट केली व अतिप्रसंग केला. यावेळी त्या युवतीने आरडा ओरड करत त्याच्या तावडीतून निसटत तिने घडला प्रकार घरी सांगितला. त्यानंतर त्या युवतीच्या वाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत त्याला बेदम चोप दिला. या प्रकाराची चर्चा कणकवली तालुक्यात सुरू होती. अशा प्रकारामुळे ग्रामस्थांनी अशा लोकांवर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकारानंतर त्याला मुंबई ला पाठवण्यात आल्याचे समजते.
दिगंबर वालावलकर कणकवली





