वागदे ग्रामपंचायत मार्फत गुरांवर वाहने धडकून होणारे अपघात रोखण्यासाठी रेडियम बेल्ट

पत्रकार गिरीश परब यांची संकल्पना
सरपंच संदीप सावंत यांचा पुढाकार
वागदे गावाच्या मधून राष्ट्रीय महामार्ग गेला असून वागदे मधील जनावरे रस्त्यावर येऊन अपघात होत असतात. त्यात करून रात्रीच्या वेळी ही गुरे रस्त्यावर आल्यास त्यामुळे अपघात घडतात. त्यावर उपाययोजना म्हणून वागदे ग्रामपंचायत कडून शेतकऱ्यांना,पशुपालकांना त्यांच्या जनावरांसाठी रेडीयम बेल्ट देणेस सुरुवात केली. जेणेकरून रस्त्यावरून रात्री जाताना वाहन चालकांना लांबूनच रेडीयम प्रकाश दिसून अपघात होन्यापासून काही प्रमाणात सुटका होईल. आज पासून गावातील शेतकऱ्यांना बेल्ट देणेस सुरुवात करणेत आली वागदे सरपंच संदीप सावंत. तंटामुक्ती अध्यक्ष. श्रीधर घाडीगावकर.ग्रामसेवक युवराज बोराडे. ग्रामपंचायत सदस्य. दीपक कदम, सुनील गोसावी आदी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर कणकवली





