ओटव ग्रामपंचायत कडून कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक गाडीचे लोकार्पण

गावातील ग्रामस्थांना डसबिनचे देखील वाटप
ओटव ग्रामपंचायत कडून स्वच्छ भारत अभियान अतंर्गत ईलेक्ट्रीक कचरा गाडीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच ओला सुका कचरा विलगिकरणा साठी डसबिन चे देखील वाटप करण्यात आले. यावेळी
सरपंच सौ रुहिता तांबे,
उपसरपंच दुर्गेश ओटवकर, माजी सरपंच हेमंत परुळेकर,
सदस्य महेश गावकर, लता तेली,
दीक्षा जाधव, वैष्णवी गावकर
ग्रामसेवक युवराज बोराडे
कर्मचारी अंगणवाडी सेविका ग्रामस्थ उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर /कणकवली





