शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे कणकवली तालुक्यातील वाघेरी कुळाचीवाडी रस्त्यासाठी १ कोटी ४६ लाख रु निधी मंजूर

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळाल्याचा शासन निर्णय पारित

युवासेनेचे सिद्धेश राणे यांची माहिती

खासदार विनायक राऊत, जिल्हासंपर्कप्रमुख अरूणभाई दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतिश सावंत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत कणकवली तालुक्यातील वाघेरी कुळाचीवाडी रस्त्यासाठी मंजुरी देऊन प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी एकूण १ कोटी ४६ लाख ७० हजार रु. निधी मंजूर करण्यात आला आहे.
यासाठी वाघेरी सरपंच सौ. अनुजा राणे, उपसरपंच सौ. स्नेहल नेवगे, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम गुरव, सौ. तनुजा गुरव, सौ. निधी राणे, सौ. कविता कदम, श्रीकांत राणे, सिद्धेश राणे, प्रकाश वाघेरकर, मुरलीधर राणे, मंगेश नेवगे, बापू कदम, गजानन राणे यांच्यासह वाघेरी वाडीतील ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतिश सावंत यांच्याकडे वाघेरी वाडीकडे जाणारा उर्वरित रस्ता मंजूर करण्याची मागणी केली होती. आता या रस्त्याला मंजुरी मिळाली असून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय ८ मार्च २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. अशी माहिती युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे यांनी दिली.

कणकवली / प्रतिनिधी

error: Content is protected !!