पोलीस दुरक्षेत्र खारेपाटण हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांनी पोलीस नाईक उद्धव साबळे यांचा केला सत्कार

पुढील प्रशासकीय सेवेसाठी दिल्या शुभेच्छा
खारेपाटण पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी पोना /उद्धव साबळे यांनी खारेपाटण दशक्रोशीत नागरिकांना चांगल्या प्रकारची सेवा दिली असून समाजातील प्रत्येक व्यक्तीशी पोलीस मित्र बनून मैत्री देखील जपली होती.खारेपाटण विभागातील गावात कायदा सुव्यवस्था चोख सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने त्यांनी अथक प्रयत्न केले.त्यांनी आपला कार्यभार अत्यंत उत्तम रित्या सांभाळला. त्याच्या या पोलीस खात्यातील सेवेचे स्थानिक तसेच दशक्रोशीतील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.साबळे आपल्या प्रशासकीय सेवेसोबतच सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत. सामाजिक बांधिलकी सोबत च आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडत आहेत.पोलीस खात्यातीलएक प्रामाणिक व्यक्तिमत्व असलेल्या उद्धव साबळे यांच्या कार्याचे सर्व स्तरातून वेळोवेळी कौतुक व समाधान व्यक्त होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण दूरक्षेत्र पोलीस स्टेशन चे पोलीस नाईक उद्धव साबळे यांची नुकतीच वैभववाडी येथे बदली झाली.पोलीस दुरक्षेत्र खारेपाटण हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांनी पोलीस नाईक उद्धव साबळे यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पोउनि/देठे साहेब ,पोकॉ-मोहीते, पोलीस पाटील चिंचवली -दिगंबर भालेकर,शेर्पे पोलीस पाटील -विनोद शेलार,बेर्ले पोलीस पाटील -रतन राउत,साळिस्ते पोलीस पाटील -गोपाळ चव्हाण,शिडवणे पोलीस पाटील -समीर कुडतरकर,संभाजीनगर पोलीस पाटील -चव्हाण ,नडगिवे पोलीस पाटील -मन्यार,कुरंगवने पोलीस पाटील -देवेन गोसावी,वायंगणी पोलीस पाटील निलेश कदम, तुकाराम शेलार (माजी पोलीस पाटील )आदि उपस्थित होते.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





