कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने पोलीस नाईक उद्धव साबळे यांचा सत्कार संपन्न

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण दूरक्षेत्र पोलीस स्टेशन चे पोलीस नाईक उद्धव साबळे यांची नुकतीच वैभववाडी येथे बदली झाली.यनिमित्ताने खारेपाटण विभागातील कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच शपप्पू ब्रम्हदंडे यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन साबळे यांचा सत्कार करण्यात आला.व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपसरपंच श्री बबलू पवार ग्रामपंचायत सदस्य स्नेहा गोसावी,पोलीस पाटील श्री देवेन गोसावी ग्रामसेवक श्री गिरीश धुमाळे आणि गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
खारेपाटण पोलीस दूरशेत्राचे पोलीस अधिकारी उद्धव साबळे यांनी खारेपाटण दशक्रोशीत नागरिकांना चांगल्या प्रकारची सेवा दिली असून समाजातील प्रत्येक व्यक्तीशी पोलीस मित्र बनून मैत्री देखील जपली होती.खारेपाटण विभागातील गावात कायदा सुव्यवस्था चोख सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने त्यांनी अथक प्रयत्न केले.अशी प्रतिक्रिया कुरंगवणे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांनी सत्कार कार्यक्रमात व्यक्त केली.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





