सहा वर्षे सर्वोत्तम सेवादिल्याबद्दल प्रभारी पोलीस पाटील हेमंत सावंत यांचा शिवडावं ग्रामपंचायतीकडून सत्कार.

कणकवली/प्रतिनिधी.

कणकवली तालुक्यातील शिवडावं या गावचे पोलीस पाटील पद रिक्त असल्याकारणाने दारिस्ते पोलीस पाटील हेमंत सावंत यांच्याकडे शिवडावं गावचा प्रभारी चार्ज होता.सुमारे सहा वर्षाहून अधिक काळ त्यांनी प्रभारी पोलीस पाटील म्हणून गावची सेवा केली.या कालावधीत करोना सारखी भयावह पारिस्थिती देखील सर्वत्र ओढावली होती आणि या काळात देखील दोन गाव त्यांनी यशस्वी रित्या सांभाळले.
नुकताच शिवडावं ग्रामपंचायतिकडून पोलीस पाटील हेमंत सावंत यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी गावचे सरपंच, ग्रामसेवक,तलाठी, ग्रामपंचायत सदस्य, कोतवाल तसेच ग्रामस्थ उपस्तित होते.प्रसंगी ग्रामस्थान्नी मनोगत व्यक्त करीत श्री सावंत यांनी केल्याल्या कार्याची स्थूती केली.
यावेळी नवनिर्वाचित पोलीस पाटील मयूर ठाकूर आणि नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष बंडू लाड यांचा देखील सन्मान करण्यात आला. तसेच सरकारच्या विविध योजना यशस्वी रित्या राबवित असलेल्या आणि घरोघरी जाऊन योजणांचा प्रचार प्रसार करणाऱ्या आशा सेविकांचा देखील सत्कार करण्यात आला.
तसेच गावात विविध प्रशासकीय योजना आणून गावच्या विकासाला चालना देणारे गावचे ग्रामविकास अधिकारी श्री. केदार भाऊ आणि गावची वसुली करण्यासाठी ज्यांनी ग्रामपंचायतीला मोलाचे सहकार्य केले असे श्री. मंगेश जाधव आणि भारतीय मजदूर संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल श्री.सत्यविजय जाधव यांचा सत्कार करण्यात आला

error: Content is protected !!