जानवली नदीवरील गणपती साना ब्रिजचे काम पूर्ण केल्याबद्दल कणकवलीकरांच्या वतीने मानले पालकमंत्र्यांचे आभार

आरसी ग्रुपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट

वर्षाच्या आत कणकवलीकरांची स्वप्नवत मागणी केली पूर्ण

कोकणचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त केसरी येथील निवासस्थानी RC ग्रुप सिंधुदुर्ग यांच्यावतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. रवींद्र चव्हाण यांनी कणकवली शहरासाठी जो कोट्यावधी रुपयांचा निधी दिला तसेच विशेष करून गेल्या 25 वर्षे गणपती सांना ब्रिज ची जीं मागणी होती ती त्यांनी तात्काळ मंजुरी देत 1 वर्षाच्या आत ब्रिज पूर्ण करून जाणवली व कणकवली करांची स्वप्नवत मागणी पूर्ण केल्याबद्दल त्यांचे कणकवली करांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी आर सी ग्रुपचे विनोद राऊळ, आनंद सावंत, महेश सावंत, औदुंबर राणे, महेश नार्वेकर, अमित मयेकर, समीर सावंत, पंकज पेडणेकर, बच्चू प्रभू गावकर, सिद्धेश बावकर, ललित बावकर, गजानन सावंत, किरण सावंत, दयानंद जाधव, बाबू आर्डेकर, व्यंकटेश सावंत, शैलेश गुरव, रुपेश साळुंखे, शुभम कलिंगन, अभि करबेळकर, पांडू सरमळकर, समीर पैगंबर आदी RC ग्रुप चे कार्यकर्ते उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!