प्रलंबित देयके मिळण्यासाठी ठेकेदार संघटना घेणार जिल्हाधिकाऱ्यांची भेट

जिल्ह्यातील ठेकेदाराने उपस्थित राहण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत कॉन्टॅक्टर्स , सुशिक्षित बेरोजगार अभियंता व सहकारी मजूर संस्था यांनी दोन वर्षे केलेल्या कामाची देयके सर्व विभागांकडे निधी अभावी प्रलंबित आहेत. सदरची केलेल्या कामाची देयके गेली दोन वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित असल्यामुळे आपण सर्व कॉन्ट्रॅक्टर्स आर्थिक संकटात सापडलेले आहोत.याबाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना भेटून निवेदन देण्यासाठी गुरुवार 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे एकत्र यायच आहे. कृपया सर्वांची उपस्थिती आवश्यक आहे. असे आवाहन ठेकेदार संघटनेच्या वतीने रामदास विखाळे यांनी केले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!