आज पहाटेच्या सुमारास महामार्गावर अपघातात कणकवलीतील दोन तरुण ठार

वागदे येथे हॉटेल मालवणी जवळ घडला अपघात
कणकवली/प्रतिनिधी
महामार्गावर हॉटेल मालवणी जवळ वागदे येथे आज पहाटे 2 ते 2.45 वा. दरम्याने उभ्या असलेल्या कंटेनरला मागाहून धडक बसल्याने दोन तरुण जागीच ठार झाले. घटने नंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावर हॉटेल मालवणी जवळ कंटेनर महामार्गावर उभा असताना ओरोस च्या दिशेने जाणाऱ्या या एक्टिवा दुचाकीची धडक उभ्या असलेल्या कंटेनरला मागाहून बसल्याने या एक्टिवा दुचाकी वर असलेले दोन्ही तरुण ठार झाले. यामधील ठार झालेल्या तरुणांमध्ये संकेत नरेंद्र सावंत (वय 24 परबवाडी कणकवली) व साहिल संतोष भगत (वय 23 विद्यानगर कणकवली) यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे, संतोष शिंदे, यांनी अपघातस्थळी धाव घेतली.
ट्राफिक हवालदार रवी इंगळे, मिलिंद आईर, संदेश परब, दिलीप ताटे, महेंद्र ताटे, किरण ताटे, अंकुश ताटे, प्रतीक परब, अजित ताटे, रिक्षा व्यवसायिक श्री.बाबू या सर्व ग्रामस्थान्नी प्रसंगावधान दाखवीत उपस्थित राहत मदतकार्य केले.