बापर्डे – राणेवाडी येथील राणे समर्थकांचा उ.बा.ठा शिवसेनेत प्रवेश

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व युवासेना देवगड तालुकाप्रमुख फरीद काझी यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश
देवगड – बापर्डे विभागातील जुवेश्वर येथे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत गाव दौरा बैठका घेण्यात आल्या. यावेळी बापर्डे गावातील राणेवाडी येथील सचिन राणे व ब्रम्हजीत राणे या राणे समर्थकांचा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व युवासेना देवगड तालुकाप्रमुख फरीद काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. सुशांत नाईक यांनी त्यांचे हाती मशाल देत पक्षात स्वागत केले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी मार्गदर्शन केले की, प्रथमता तुम्ही शिवसेणें च्या ठाम पाठीशी राहून आपला बालेकिल्ला जपलात त्याबद्दल जुवेश्वर वासिसांचे आभार मानतो. असेच कयम शिवसेनेच्या पाठी रहा, तुम्हाला लागणारी मदत पक्षाच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळो करू. गेली अनेक वर्षे या मतदार संघात राणेंची सत्ता आहे तरी या मतदार संघाचा विकास झाला नाही, कणकवली-देवगड-वैभववाडी येथील बस स्थानक, शासकीय रुग्णालय यांची बिकट अवस्था का ? एवढी वर्षे सत्ता असून राणेंनी विकास का केला नाही. आपल्या मतदार संघाला विकास कामान पासून वंचित का ठेवले याची विचारणा आता जनतेतून यायला लागली आहे. ज्या ठिकाणी राणेंना कमी मते आहेत त्या ठिकाणी जाऊन राणे लोकांना वेगवेगळी अमिशे दाखवत आहेत, तुम्ही त्या खोट्या अमीशांना बळी पडू नका. व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा सोबत राहून आता येणाऱ्या विधानसभेवर विजयाचा भगवा फडकवूया. असे यावेळी जिल्हाप्रमुख नाईक यांनी सांगितले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना देवगड तालुका प्रमुख फरीद काझी, उपतालुका प्रमुख दत्ताराम तिर्लोटकर, शाखाप्रमुख बाळकृष्ण नरसाळे, प्रदीप येझरकर, आनंद घाडी, रोशन मुळम, रवींद्र मुळम, दिनेश वेद्रुक, नितीन घाडी, विठ्ठल वेद्रुक आदी शिवसैनिक उपस्थित होते.
देवगड प्रतिनिधी