साळिस्ते येथे दिलीप तळेकर यांचा सत्कार संपन्न

साळीस्ते या गावच्या वतीने नुकतेच निवड झालेले नवनिर्वाचित भाजप पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष श्री दिलीप तळेकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमाला गावप्रमुख तथा माजी उपसरपंच बाळासाहेब पाटील,उपसरपंच जितेंद्र गुरव,प्रेमानंद कुलकर्णी,माजी सरपंच अनंत बारस्कर,माजी उपसरपंच उदय बारस्कर,ग्रामपंचायत सदस्य मंगेश कांबळे,माजी सदस्य मयुरेश लिंगायत, महेश गुरव, तंटामुक्ती अध्यक्ष मा.सुरेश साळिस्तेकर,अनंत गुरव, बबन कांजीर,चंद्रकांत रांबाडे, ग्रामपंचायत सदस्य हर्षदा ताम्हणकर,तेजल पवार,मानसी बारस्कर, प्रेमलता गुरव, विलास कांबळे, नरेश ताम्हणकर, सचिन ताम्हणकर,संजय ताम्हणकर, दत्ताराम रामाणे,सत्यवान कांजीर, मंगेश पाटील,चंद्रकांत पावसकर, आदी मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिलीप तळेकर यांनी सांगितले,साळिस्ते ग्रामस्थांनी केलेला सत्कार हा माझ्या कुटुंबांतील सत्कार आहे त्यामुळे साळिस्ते गावच्या विकासासाठी मी मा.कार्यसम्राठ आमदार नितेश राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच नेहमी आपल्या सोबत आहे असे असे वचन दिले व येणा-या काळात साळिस्ते गावातील राहीलेली विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन देखील ग्रामस्थांना व पदाधिकाऱ्यांना दिले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण