पंडित हेमंत पेंडसे यांच्या हस्ते गुरुपौर्णिमा 2024 चा शुभारंभ

आचरेकर प्रतिष्ठान कणकवली च्या वतीने आयोजन

आचरेकर प्रतिष्ठान कणकवली संचलीत आणि पंडित जितेंद्र अभिषेकी सघनगान केंद्र आयोजित गुरुपौर्णिमा २०२४ चे उद्घाटन पंडित हेमंत पेंडसे यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी संघनगान केंद्राचे गुरू पंडित समीर दुबळे तबला प्रशिक्षक चारूदत्त फडके उपस्थित होते.
यावर्षी तीन सत्रात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शास्त्रीय गायन आणि तबला वादन सादर केले सदर सत्राची सांगता पंडित सुरेश तळवलकर यांचे शिष्य चारूदत फडके यांचे सोलो तबला वादन झाली यावेळी पंडित समिर दुबळे यांच्या तीन्ही भगिनी खास सोहळ्यास उपस्थित होत्या तसेच संस्थेच्ये कार्याध्यक्ष ॲड एन. आर.देसाई. विश्वस्त डॉ. समीर नवरे, सीए दामोदर खानोलकर, कार्यवाह शरद सावंत, सहकार्यवाह सिमा कोरगावकर, खजिनदार धनराज दळवी, मनोज मेस्त्री उपस्थित होते. या सत्रात दामोदर खानोलकर, संदिप पेंडुरकर, डॉ. पांडुरंग सुतार, संपदा नर, सानिका गावडे, श्रुती सावंत, ऋचा कशाळीकर, ईश्वरी तेजेम यांचे गायन आणि दर्शन परब यांचे तबला वादन झाले. या सोहळ्यास संगीतप्रेमीची उपस्थिती होती. पुढील दोन्ही सत्र रविवार १८/०८/२०२४ ला सकाळी ९:३० ते १२:३० संध्याकाळी ५:३० ते रात्री ८:३० ला सांगता होणार आहे.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!