गेल्या चार वर्षांत तालुकाध्यक्ष म्हणून यशस्वी कामगिरी केली !
माजी तालुकाध्यक्ष संतोष कानडे। यांची माहिती
पक्ष संघटनेसाठी जोमाने काम करणार
भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका आणि विधानसभा मतदारसंघात मंडल अध्यक्ष निवडी करण्यात आल्या आहेत. कणकवली तालुक्यात नूतन मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर आणि मिलिंद मेस्त्री निवड झाली आहे.आता आपली भाजपा जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती झाली आहे.पुढील काळात पक्ष संघटनेसाठी जोमाने काम करणार आहे.गेल्या चार वर्षांत तालुकाध्यक्ष म्हणून यशस्वी कामगिरी आ.नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली केली असल्याची माहिती भाजपा नवनिर्वाचित चिटणीस संतोष कांनडे यांनी दिली.
कणकवली शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे,भाजपा मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,सरचिटणीस महेश गुरव, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रवींद्र शेट्ये, तिवरे सरपंच भाई आंबेरकर , कोंडये सरपंच ऋतुराज तेंडुलकर उपस्थित होते.
कणकवली तालुक्यात माझ्यावर मंडल अध्यक्ष पदावर जबाबदारी दिली होती. भाजपात तीन वर्षे काम करायचा कालावधी होता.मात्र,१४ महिन्यांचा बोनस मिळाला.गेल्या चार वर्षांत ज्या ज्या निवडणुकी झाल्या त्यामध्ये माझ्या सहकारी पदाधिकाऱ्यांमुळे चांगले यश मिळाले.मला काम करताना दोन जिल्हाध्यक्ष लाभले,त्यामध्ये राजन तेली,प्रभाकर सावंत यांच्या हाताखाली काम करता आले. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे,पालकमंत्री रविंद्र चव्हाण,आ.नितेश राणे मार्गदर्शन केलं,त्यामुळे चांगली कामगिरी केली.माझ्यासोबत काम करताना सर्व पदाधिकारी काम करत होते,त्यांनी काम केल्याने माझी कारकीर्द यशस्वी झाली,असे संतोष कानडे यांनी सांगितले.
आमचे सहकारी मिलिंद मेस्त्री यांची फेरनिवड करण्यात आली.कारण दीड वर्षापूर्वी त्यांची निवड झाली. त्यामुळे मेस्त्री यांचा कार्यकाळ वाढला आहे.परंतु, कणकवली तालुक्यात माझ्याबद्दल काही गैरसमज निर्माण होत असल्याने गोंधळ होता.माझी जिल्हा चिटणीस पदी नियुक्ती झाली आहे.आतापर्यंत माझ्यासोबत काम केलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो.पदाधिकारी, बूथ अध्यक्ष, कार्यकर्ते याचे आभार मानतो,असे श्री.कानडे यांनी सांगितले.लोकसभेत कणकवली तालुक्याने चांगले काम केलं आणि विधानसभेत केलं जाणार आहे.माझी चिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापुढील काळात संघटनात्मक बांधण्यासाठी चांगले काम करणार असल्याचे संतोष कांबळे यांनी सांगितले.
राजश्री शाहू महाराज कलाकार मानधन समितीचा जिल्हाध्यक्ष म्हणून कलाकारांना न्याय देण्याचे काम करीत आहे.गेल्या दोन वर्षांत २०० कलाकारांना न्याय देण्याचे काम केले आहे.आता नवीन १०० कलाकारांच्या अर्जाना मंजुरी दिली आहे. त्या कलाकारांना त्या त्या तालुक्यात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून मान्यतापत्रे वाटप केली जाणार आहोत.पूर्वी २२५० मानधन होते,आता ५ हजार मानधन शासनाने केलं आहे.जिल्ह्यातील १०० कलाकारांचा कोठा आता २०० कलाकारांना लाभ देण्यासाठी मागणी सांस्कृतिक मंत्री सुधीर मनगुटीवार यांच्याकडे केली आहे,असे संतोष कानडे यांनी सांगितले.
कणकवली, प्रतिनिधी