खारेपाटण येथील शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते प्रणय गुरसाळे यांचा आम. नितेश राणे यांच्या उपस्थित भाजप पक्षात प्रवेश….
खारेपाटण येथील शिवसेना पक्ष शिंदे गटाचे युवा कार्यकर्ते श्री प्रणय गुरसाळे यांनी आज भारतीय जनता पक्षात भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित खारेपाटण येथे जाहीर प्रवेश केला. कणकवली देवगड वैभववाडी आमदार मतदार संघाचे भाजप आमदार नितेश राणे हे आमदार आपल्या दारी या उपक्रमा अंर्गत गाव भेट घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी खारेपाटण येथे आले आले असता यावेळी शिवसेना शिंदे पक्षाचे कार्यकर्ते श्री प्रणय गुरसाळे यांनी आमदार नितेश राणे यंच्या नेतृत्वावर विश्वास भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष श्री संतोष कानडे, मिमिंद मेस्त्री,रवींद्र जठार,दिलीप तळेकर,मनोज रावराणे,सुरेश सावंत,खारेपाटण शक्ती केंद्र प्रमुख सुधीर कुबल,सूर्यकांत भालेकर,भाऊ राणे, खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर,उपसरपंच महेंद्र गुरव,माजी सरपंच रमाकांत राऊत, इस्माईल मुकादम,आदी मान्यवर पदाधिकारी तसेच गावातील प्रमुख मान्यवर मधुकर शेठ गुरव,प्रवीण लोकरे,नदू कोरगावकर आदी उपस्थित होते. आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते भाजप पक्षाची शाल व पुष्पगुच्छ देऊन प्रणय गुरसांळे यांचे भाजप पक्षात स्वागत करण्यात आले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण