मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षपदी संजना सावंत यांची निवड
अशासकीय सदस्य म्हणून सावी लोके, सीमा नानीवडेकर यांची वर्णी
कणकवली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासाठी करण्यात आली निवड
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विधानसभा क्षेत्रनिहाय समितीची निवड करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी माजी जि. प. अध्यक्ष संजना संदेश सावंत यांची निवड करण्यात आली आहे. तर समितीच्या सदस्य पदी सावी गंगाराम लोके व सीमा शरदचंद्र नानिवडेकर व सदस्य सचिव म्हणून उपविभागीय अधिकारी कणकवली यांची निवड करण्यात आली आहे. या समितीची पहिलीच बैठक आज 5 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आली असून , या बैठकीला तात्पुरत्या व पात्र ठरलेल्या व पोर्टलवर दिसणाऱ्या लाभार्थ्यांच्या यादीला मंजुरी देण्यात येणार आहे. या बैठकीला वेळीच उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले आहेत. या समितीच्या अध्यक्षपदी व अशासकीय सदस्य म्हणून निवड झालेल्या सर्वांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली