विधानसभेसाठी कणकवली मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने फुंकले रणशिंग

“भगवा सप्ताह” अंतर्गत कणकवली विधानसभे ची पहिली बैठक कळसुली जि. प. येथून सुरु

भगवा सप्ताह अंतर्गत गाव तेथे प्रचार कमिटी नेमणार

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहिर केल्याप्रमणे संपुर्ण महाराष्ट्रामध्ये भगवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने कणकवली विधानसभे मध्ये कळसुली जिल्हा परिषद येथे भगवा सप्ताह ची प्रथम बैठक पार पडली.कणकवली विधानसभा मतदार संघातून कळसुली येथून भगवा सप्ताह ची सुरवात करण्यात आली. कळसुली जिल्हा परिषद च्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आळी. यामध्ये असे ठरवण्यात आले की प्रत्येक गावात प्रचार कमेटी नेमून, ज्या ठिकाणी रिक्त पदे असतील त्या ठिकानी पदाधिकारी नेमण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले. येत्या कणकवली विधानसभे वरती भगवा फडकवन्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. याप्रसंगी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक हे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहिर केल्याप्रमाणे आपण कणकवली मतदार संघात भगवा साप्ताहची सुरवात कळसुली जिल्हा परिषद येथून करत आहोत, जिल्हाप्रमुख म्हणून मी कणकवली विधानसभा मतदार संघात मालवण मध्ये भगवा सप्ताह सुरु करण्यासाठी जे काही प्रयन्त करावे लागतील ते आपण करूया व येत्या कणकवली विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी आपण सर्व जण सज्ज होऊया. पदाधिकाऱ्यांच्या बैठका गाव वार पूर्ण करण्याची जबाबदारी पक्षाचे महत्वाचे नेते असतील तालुका प्रमुख असतील यांची असेल. शिवसेना सभासद नोंदनी 50 हजार चा संकल्प देखील आपण करत आहोत, हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी पर्यंत केले पाहिजेत. झालेल्या प्रराभवाचे शल्य न घेता येत्या विधानसभे वर भगवा फडकवूया.
यावेळी अतुल रावराणे यांनी देखील मार्गदर्शन केले, मागच्या विधानसभेच्या वेळी कमी कालावधीत कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत ही वाखण्य जोगी होती. ते मतदान उद्धव ठाकरे विश्वास ठेऊन व तुम्ही घेतलेल्या मेहनतिमुळे मिळाली होती, त्याचउलट समोरच्यांना जे मतदान मिळाले आहे ते 100 कोटी च्या धनशक्ती वर मिळालेली मते होती. त्यामुळे येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात भगवा फडकवण्यासाठी आपण झटून काम करून उद्धव ठाकरेंचे हात बळकट करूया.
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक म्हणाले की, काही जिल्हा परिषद ह्या वाटून दिल्यामुळे त्यात कळसुली जिल्हा परिषद ची जबाबदारी माझ्या वर असल्यामुळे ही बैठक प्रथम आपण घेत आहोत, गावा-गावात मशाल चिन्ह पोहचून, प्रत्येक गावात आपला पदाधिकारी सक्षम होईल या दृष्टीने काम करणे गरचेजे आहे. येत्या विधासभेसाठी गाव वार प्रचार कमेट्या नेमून एक प्रचार यंत्रणा तयार करण्याची जबाबदारी, आमच्या वर देण्यात आली आहे,या अनुषंगाने भगवा सप्ताहच्या खाली आपण प्रत्येक गावात प्रचार कमिटी तयार करून या विधानसभे वर भगवा फडकवण्यासाठी आपण जि मेहनत आता पर्यंत घेत आलो आहोत. त्यापेक्षा जास्त मेहनत घेऊन फक्त विधानसभेसाठीच नाही तर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या मध्ये देखील भगवा फडकवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सज्ज झाले पाहिजे.
यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, विभागप्रमुख चंदू परब, युवासेना उपजिल्हाप्रमुख ललित घाडीगावकर, रुपेश आमडोस्कर, रवि सावंत, उपतालुका प्रमुख राजू राणे, युवासेना विभागप्रमुख रोहित राणे, ग्रामपंचायत सदस्य नंदू परब, उपविभाग प्रमुख महादेव राठोड, बाबू कुलकर्णी, रमाकांत राणे,नितीन धुरी आदी कळसुली जिल्हा परिषद येथील पदाधिकारी उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!