नेफडो सिंधुदुर्ग आणि भारत स्वाभिमान ट्रस्ट सिंधुदुर्ग, पतंजली योग समिती सिंधुदुर्ग, महिला पतंजली सिंधुदुर्ग,किसान सेवा समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीने वृक्षवाटप.

वृक्ष वितरित करून आचार्य बाळकृष्ण यांचा वाढदिवस “जडी बुटी दिन” म्हणून साजरा.

कणकवली/मयूर ठाकूर

नेफडो सिंधुदुर्ग आणि भारत स्वाभिमान ट्रस्ट सिंधुदुर्ग, पतंजली योग समिती सिंधुदुर्ग, महिला पतंजली सिंधुदुर्ग,किसान सेवा समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने चार ऑगष्ट आचार्य बाळकृष्ण यांचा वाढदिवस हा “जडी बुटी दिन” म्हणून साजरा करण्यात आला.या निमित्त नेफडो सिंधुदुर्ग च्या वतीने वृक्षवाटप करण्यात आले.विविध पन्नास झाडांचे वाटप यावेळी करण्यात आले,यामध्ये कल्पवृक्ष, चिकू,आंबा कलम,सुपारी,रतांबे आणि काजू कलम या रोपांचा समावेश होता.हा कार्यक्रम डॉ तुळशीराम रावराणे यांचे जावई डॉ.राहुल जगताप यांच्या दवाखान्यासमोर संपन्न झाला.
प्रसंगी भारत स्वाभिमान ट्रस्ट सिंधुदुर्ग प्रभारी डॉ.तुळशीराम रावराणे,श्री.मनोहर पालयेकर,श्री.सखाराम सकपाळ,सौ.सुमन सकपाळ,सौ.प्रतिभा करंबळेकर,श्री.शंकर पोवार, श्री.किशन ठोंबरे,डॉ.राहुल जगताप,श्री.प्रभाकर सावंत,सौ.सावंत हे सर्व योगशिक्षक उपस्थित होते तसेच नेफडो सिंधुदुर्ग चे जिल्हा संघटक श्री.पंढरी जाधव,नेफडो सिंधुदुर्ग शाखा-कणकवलीचे युवाध्यक्ष आणि पत्रकार श्री.मयूर ठाकूर तसेच श्री.चंद्रकांत पवार आणि शिवडाव गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री.विनोद गावकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. तुळशीराम रावराणे यांनी केले तर विविध 50 झाडांची रोपे हि नेफडो सिंधुदुर्ग चे जिल्हा संघटक श्री.पंढरी जाधव यांनी उपलब्ध करून दिली.

error: Content is protected !!