हळवल शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांचे सहकार्य

सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या सहकार्याने हळवल गाव भाजपा तर्फे हळवल गावातील जिल्हापरिषदेच्या शाळा न 1/2/3 या तिन्ही शाळेत वह्या वाटप कार्यक्रम करण्यात आल. त्या प्रसंगी गावचे प्रथम नागरिक सरपंच अपर्णा चव्हाण, उपसरपंच प्रभाकर राणे, माजी सरपंच शशिकांत राणे, प्रदिप गावडे,लवू परब सुदर्शन राणे,अशोक चव्हाण आणि शाळा मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. तसेच पुढील 15 ऑगस्ट ला दुपारी 11 वाजता ग्रामपंचायत सभागृह येथे इयत्ता पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम करण्यात येणार आहेत. तरी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गाव भाजपा तर्फे करण्यात आले आहे.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!