शाळेला सुट्टी ;तरीही विद्यार्थ्यांनी केली लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
प्रतिनिधी l दोडामार्ग
तालुक्यात होणारी अतिवृष्टी, तिलारी नदीची वाढणारी पातळी आणि ठिकठिकाणी निर्माण झालेली पूरस्थिती पाहून जिल्हा प्रशासनाने तालुक्यातील सर्व शाळान्ना विशेष सुटी जाहीर केली. मात्र आज (ता. १) लोकमान्य टिळक पुण्यतिथी असल्याने कळणे शाळा क्रमांक ३ च्या विद्यार्थ्यांनी सुटी न घेता ठरल्याप्रमाणे लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी केली. त्यासाठी मुलांना पालकांची साथ लाभली.
यावेळी बळीराम कमलाकर देसाई या विद्यार्थ्याने लोकमान्य टिळक यांच्यासारखा पेहरावही केला होता.शाळेला सुट्टी जाहीर करूनही मुलांनी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्साहाने साजरी केली. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आ